Ashok Chavan : राहुलजी यांचे विधान जर माझ्या संदर्भातलं असेल तर ते हास्यास्पद आहे

Ashok Chavan : राहुलजी यांचे विधान जर माझ्या संदर्भातलं असेल तर ते हास्यास्पद आहे

इंडिया आघाडीच्या सभेत अशोक चव्हाण यांचे नाव न घेता राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.
Published by :
Siddhi Naringrekar

इंडिया आघाडीच्या सभेत अशोक चव्हाण यांचे नाव न घेता राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला. याच पार्श्वभूमीवर आता अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, राहुलजी यांचे विधान जर माझ्यासंदर्भातलं असेल नाव कुणाचं घेतलं नसल्यामुळे मला आता तेवढंच म्हणायचं आहे.

जर ते माझ्यासंदर्भातलं असेल तर ते हास्यास्पद आहे. मी सोनिया गांधी यांना भेटलेलो नाही. त्यामुळे मी सोनिया गांधी यांना भेटून माझ्या भावना व्यक्त केल्यासंदर्भातलं जे विधान झालेलं आहे. जे चुकीचं आहे दिशाभूल करणार आहे आणि याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे पहिली गोष्ट.

दुसरी गोष्ट अशी की मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयामध्ये पक्षाचं काम करत राहिलेलो आहे. त्यामुळे मी पक्ष सोडेपर्यंत माझी पक्ष सोडण्याची माहिती कुणालाही नव्हती. असं अशोक चव्हाण म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com