Rajasthan Election Result : मोठी बातमी! अशोक गेहलोत राज्यपालांकडे सादर करणार राजीनामा

Rajasthan Election Result : मोठी बातमी! अशोक गेहलोत राज्यपालांकडे सादर करणार राजीनामा

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात आघाडी घेतली आहे.
Published by :
shweta walge

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात आघाडी घेतली आहे. तर, तेलंगणा राज्यात कॉंग्रेस आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतील आणि त्यांना राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचा विजय निश्चित असल्याचे पाहायला मिळत आहेत. ट्रेंडमध्ये भाजप काँग्रेसपेक्षा पुढे आहे. काँग्रेसला सध्या 69 जागा आहेत तर भाजपाला 115 जागा आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com