रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी १३ हजार कोटींचा निधी; कोणत्या रेल्वे स्थानकासाठी किती निधी? रेल्वेमंत्र्यांनी केली घोषणा

रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी १३ हजार कोटींचा निधी; कोणत्या रेल्वे स्थानकासाठी किती निधी? रेल्वेमंत्र्यांनी केली घोषणा

केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात १३ हजार ५३९ कोटींचा निधी महाराष्ट्राला दिला आहे. राज्याच्या रेल्वे विकासासाठी १३ हजार ५३९ कोटींची तरतूद करण्यात आलीभुसावळ रेल्वे विभागासाठी १४७०.९४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे १६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

वर्ष २००९ ते २०१४ या दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्रासाठी ११७० कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्या तुलनेत महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यासाठी यंदा मोठी तरतूद आहे. असे केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव म्हणाले.

कोणत्या रेल्वे स्थानकासाठी किती निधी?

मुंबई सेंट्रल : ८५०

ठाणे : ८०० कोटी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल : १८१३ कोटी

औरंगाबाद : ३८० कोटी

नागपूर : ५८९ कोटी

जालना : १७० कोटी

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com