Legal Knowledge : महिलांना मासिक पाळीची तारीख विचारणं गुन्हा आहे का?
Legal Knowledge : महिलांना मासिक पाळीची तारीख विचारणं गुन्हा आहे का? Legal Knowledge : महिलांना मासिक पाळीची तारीख विचारणं गुन्हा आहे का?

Legal Knowledge : महिलांना मासिक पाळीची तारीख विचारणं गुन्हा आहे का?

भारतामध्ये महिलेला तिच्या पिरियड्सबद्दल विचारल्यास त्याला थेट गुन्हा ठरवणारा काही विशिष्ट कायदा नाही. मात्र, जर हा प्रश्न तिला घाबरविण्याच्या, अपमान करण्याच्या किंवा तिची खिल्ली उडविण्याच्या उद्देशाने विचारला गेला, तर तो गुन्हा ठरू शकतो.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • आपल्या समाजात महिलांच्या मासिक पाळी (पिरियड्स) आणि लैंगिक आरोग्याबद्दल आजही खुल्या चर्चा नाहीत.

  • मासिक पाळीचा विषय कधीकधी अपमानास्पद किंवा गोपनीय समजला जातो.

  • त्यामुळे काही लोक महिलांना त्यांच्या पिरियड्सची तारीख विचारतात. परंतु, हा प्रश्न कायद्याने गुन्हा ठरतो का?

आपल्या समाजात महिलांच्या मासिक पाळी (पिरियड्स) आणि लैंगिक आरोग्याबद्दल आजही खुल्या चर्चा नाहीत. मासिक पाळीचा विषय कधीकधी अपमानास्पद किंवा गोपनीय समजला जातो. त्यामुळे काही लोक महिलांना त्यांच्या पिरियड्सची तारीख विचारतात. परंतु, हा प्रश्न कायद्याने गुन्हा ठरतो का? याबद्दल अनेकांना स्पष्ट माहिती नाही.

महिलेला पिरियड्सची तारीख विचारणे गुन्हा आहे का?

भारतामध्ये महिलेला तिच्या पिरियड्सबद्दल विचारल्यास त्याला थेट गुन्हा ठरवणारा काही विशिष्ट कायदा नाही. मात्र, जर हा प्रश्न तिला घाबरविण्याच्या, अपमान करण्याच्या किंवा तिची खिल्ली उडविण्याच्या उद्देशाने विचारला गेला, तर तो गुन्हा ठरू शकतो. पिरियड्सविषयी विचारलेली टिप्पणी किंवा प्रश्न महिलेच्या प्रतिष्ठेचा, गोपनीयतेचा उल्लंघन करत असतील, तर ते कायद्यानुसार योग्य ठरू शकते.

गुन्हा सिद्ध झाल्यास काय दंड किंवा शिक्षा? जर कोणत्याही व्यक्तीने महिला पिरियड्सबद्दल तिच्या गोपनीयतेला धक्का देऊन प्रश्न विचारला किंवा तिच्या खाजगी बाबींबद्दल टिप्पणी केली, तर तो लैंगिक छळ मानला जाऊ शकतो. अशा प्रकरणांमध्ये Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redressal) Act, 2013 नुसार संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. समाजात अशा घटनांचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जर महिलेला पिरियड्सबद्दल सार्वजनिक ठिकाणी किंवा सोशल मीडियावर प्रश्न विचारला गेला, ज्यामुळे तिला लज्जास्पद वाटावे, तर तो गोपनीयतेच्या उल्लंघनाच्या कक्षेत येईल. अशा प्रकरणात एका वर्षापर्यंत कारावास, आर्थिक दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. महिलांची गोपनीयता आणि प्रतिष्ठा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पिरियड्ससारख्या संवेदनशील विषयावर विचारताना, प्रत्येकाने आदर आणि समजूतदारपणा दाखवावा.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com