आसामच्या मुख्यमंत्र्याचे CM शिंदेंना पत्र
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी हे पत्र ट्विट केलं आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार प्रताप सरनाईक, आमदार अतुल भातखळकर यांनी भटक्या कुत्र्यांवरचा मुद्दा म्हटला होता. महाराष्ट्रातील सर्व भटके कुत्रे आसामला पाठवा, आसाममधील लोक कुत्र्याचे मांस खातात. तिथले लोक कुत्र्याचे मांस खातात जसे आपण हरण खातो. असे ते म्हणाले होते.
याच पार्श्वभूमीवर त्यांनी पत्र लिहिले आहे या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, राज्याचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या भटक्या कुत्र्यांना आसाममध्ये पाठवण्याच्या प्रस्तावावर सरमा यांनी या पत्रात म्हटले आहे. आमदाराच्या वक्तव्यामुळे आसामच्या लोकांसह मी अत्यंत निराश आहे. आमदाराने आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि खेद व्यक्त करणार प्रसिद्धीपत्रक काढावे. असे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना सांगितले.