Admin
ताज्या बातम्या
मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला; हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू
मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला
मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञाताने हा हल्ला केला आहे. शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉक करताना हल्ला करण्यात आला आहे. संदीप देशपांडेंवर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाही. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे देशपांडे जखमी होऊन खाली कोसळले.
या हल्लेखोरांनी देशपांडे यांच्यावर हल्ला करून तिथून पळ काढला. जखमी अवस्थेतील देशपांडे यांना तात्काळ हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.