Mumbai Local train : चालत्या लोकलमध्ये तरुणीवर अत्याचार; हार्बर मार्गावरील घटना

परीक्षेला जात असताना चालत्या ट्रेनमध्ये एका 20 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

परीक्षेला जात असताना चालत्या ट्रेनमध्ये एका 20 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी घडली ज्यावेळी विद्यार्थिनी सकाळी ७:२८ च्या CSMT-पनवेल लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या महिला डब्यात प्रवास करण्यासाठी बसली होती. ट्रेन सुरू होताच आरोपी डब्यात चढला तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू केला विद्यार्थिनी स्वतःला बचाव करण्याचा प्रयत्नही केला.

एका वृद्ध महिलेने पोलिसांना फोन करणार असल्याचे धमकीही दिली पण आरोपीने काहीच प्रतिसाद दिला नाही. ट्रेन मस्जिद बंदर रेल्वे स्थानकावर येताच विद्यार्थी ट्रेनमधना उतरून स्वतःचा बचाव केला. जीआरपी आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने आरोपी नवाज करीमला 8 तासांत अटक केली आहे,पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अशा घटनांमुळे लोकल गाड्यांमधील रेल्वे पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com