छत्तीसगड आणि  मिझोराममध्ये विधानसभा  निवडणुकीसाठी आज मतदान

छत्तीसगड आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे.

नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आज छत्तीसगडमधील 20 विधानसभा जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. तर, मिझोराममधील सर्व 40 जागांसाठी मतदान होत आहे. कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

छत्तीसगड आणि  मिझोराममध्ये विधानसभा  निवडणुकीसाठी आज मतदान
चौकशी करा, दूध का दूध पानी का पानी होईल; जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड आणि मिझोरामच्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. छत्तीसगडच्या मतदारांसाठी ते म्हणाले, आज छत्तीसगडमध्ये लोकशाहीचा पवित्र सण आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे की त्यांनी मतदान करावे आणि या उत्सवात सहभागी व्हावे. या निमित्ताने पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या राज्यातील सर्व तरुण मित्रांचे माझे विशेष अभिनंदन.

मिझोरमच्या मतदारांसाठी पंतप्रधान म्हणाले, मी मिझोरामच्या लोकांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो. मी विशेषत: तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा सण बळकट करण्याचे आवाहन करतो.

छत्तीसगडमधील 20 जागांपैकी अनेक जागा नक्षलग्रस्त बस्तर विभागात आहेत. छत्तीसगडच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यासाठी 25 महिलांसह 223 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. तर, मिझोराममध्ये 174 उमेदवार मैदानात आहेत. या निवडणुकीची 3 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे पाहिले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com