चौकशी करा, दूध का दूध पानी का पानी होईल; जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर

चौकशी करा, दूध का दूध पानी का पानी होईल; जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर

छगन भुजबळांच्या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Published on

छत्रपती संभाजीनगर : अंतरवालीत झालेल्या लाठीचार्जवेळी पोलीस जखमी झाले. ज्यांनी दगड फेकले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असा निशाणा छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर आता मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिले आहे. लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांची चौकशी करा, चौकशीनंतर दूध का दूध पानी का पानी होईल, असे मनोज जरांगेंनी म्हंटले आहे.

चौकशी करा, दूध का दूध पानी का पानी होईल; जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर
...अन्यथा सर्व सार्वजनिक प्रकल्प रोखू; मुंबई हायकोर्टाचा इशारा

मनोज जरांगे म्हणाले की, जाळीपोळीचे आम्ही समर्थन केले नाही, आम्ही आधीपासून म्हणतो उद्रेक आणि जाळपोळ करू नका. कुणी केली जाळपोळ याची चौकशी लावा. आमचे साखळी उपोषण करणारे मुले घरी परतल्यानंतर मराठा समाजाचं आंदोलन बदनाम व्हावं म्हणून काही गोष्टी केल्या गेल्या. कुणीतरी दुसऱ्यांनी जाळपोळ केली. रोष धरून लोकांना टार्गेट केले जात आहे, ज्यांचा दोष नाही त्यांना टार्गेट करू नका असे आमचे मत आहे.

आरक्षण संपवण्याचे काम राज्यात सुरू असल्याचा दावा छगन भुजबळांनी केला आहे. यावर बोलताना जरांगे म्हणाले, ओबीसींचे आरक्षण कसे संपेल? आयोगाच्या आडून जे जास्तीचे खाल्ले जाते ते आमचे आम्हाला द्या. जनगणना करणे आमच्या हातात आहेत का? तुम्ही सरकारमध्ये आहेत, तुम्ही करा जनगणना, असे त्यांनी म्हंटले आहे.

सर्व अधिकाऱ्यांची होऊ द्या चर्चा. जे सस्पेंड व्हायला हवे त्यांच्याऐवजी दुसरे सस्पेंड झाले. पोलिसांना कुणी ऑर्डर केले आम्हाला मारायचे. लाठीचार्ज प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी लावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, ओबीसी बांधव आवाज उठवणार नाही, आम्ही एकमेकांचे सख्खे मित्र असल्याचेही मनोज जरांगेंनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com