Indrayani River Bridge Collapsed : इंद्रायणीवरील पूल कोसळला; मृताच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
आज मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरात इंद्रायणी नदीच्या काठावरील जुना पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी सहलीसाठी आले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
तर बचावकार्य सुरु आहे. या ठिकाणी अंदाजे 100 पर्यटक वर्षा विहारासाठी आले होते. दरम्यान या दुर्घटने मधून एकूण 38 व्यक्तींचा बचाव करण्यात आला असून त्यापैकी 18 जण जखमी झाले. त्यांना प्रशासनाकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याचसोबत असं ही सांगण्यात आलं आहे की, जे लोक जखमी झाले आहेत, त्यांच्यावर पूर्णपणे मोफत उपचार केले जातील. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी ही माहिती दिली आहे