Shubhanshu Shukla : अंतराळवीर शुभांशु शुक्ला लवकरच पृथ्वीवर परतणार

Shubhanshu Shukla : अंतराळवीर शुभांशु शुक्ला लवकरच पृथ्वीवर परतणार

अंतराळात 14 दिवसांच्या मोहिमेनंतर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतणार
Published by :
Team Lokshahi
Published on

आपल्या भारत देशाचा गौरव अंतराळवीर शुभांशु शुक्ला लवकरच परत पृथ्वीवर परतणार आहे. भारतीय हवाई दलाचे कॅप्टन शुभांशु शुक्ला हे एक्सियम-4 मिशन अंतर्गत अंतराळात झेपावल्यानंतर आता तब्ब्ल 14 दिवसांनी त्यांचा पृथ्वीवरील परतीचा प्रवास लवकरच सुरु होणार आहे. 10 जुलै ही तारीख जरी त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी निश्चित केली असली तरी फ्लोरिडा किनाऱ्यावरील हवामानाच्या स्थितीचा अंदाज घेऊन मगच नासा अधिकृतरीत्या तारीख जाहीर करणार आहेत.

पायलट म्हणून सहभागी झालेल्या शुभांशू यांनी 25 जून 2025 रोजी फ्लोरिडा येथून फाल्कन 9 रॉकेटमधून 28 तासांच्या प्रवासानंतर, त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयएसएसमध्ये प्रवेश केला. 14 दिवसांपासून ISS वर काम करण्याची संधी शुभांशु शुक्लासह त्याच्या 4 साथीदारांना मिळाली आहे.सध्या तिथे ते वेगवेगळे प्रयोग करत असून त्याचाच एक भाग म्ह्णून त्यांनी तिथे प्रायोगिक तत्वावर शेती करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांनी तिथे मूग आणि मेथी यांचे बियाणे पेरून त्यांना अंकुर फुटतानाचे फोटो सुद्धा काढले आहेत. या14 दिवसांच्या काळात त्यांनी स्टेम सेल संशोधनावरही महत्वपूर्ण काम केले आहे.

असे असले तरी आता 14 दिवसांच्या मिशन नंतर त्यांच्या मोहिमेचा शेवटचा आठवडा असून त्यांची आता पृथ्वीवर परतण्याची वेळ आली आहे. सध्या तरी एक्सियम-4 पृथ्वीवर कधी परतणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही. याबाबत युरोपियन स्पेस एजन्सीने त्यांच्या परतीची तारीख तारीख 14 जुलै असू शकते असे भाकीत वर्तवले आहे. तरी त्यांच्या पृथ्वीवरील परतीचा प्रवास हा फ्लोरिडा किनाऱ्यावरील हवामानावर अवलंबून असल्यामुळे त्या हवामानाच्या स्थितीचा अंदाज घेऊनच नासा अधिकृतपणे त्यांच्या परतीच्या प्रवासाची तारीख जाहीर करणार आहेत. सध्या त्याचे कुटुंब, देश आणि जगातील असंख्य वैज्ञानिक त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com