Sunita Williams : सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या; प्रवास नेमका कसा होता?
अखेर 9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहे. 9 महिन्यांनी अवकाशातून पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विल्यम्स यांची पहिली झलक समोर आली आहे. अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचं अखेर पृथ्वीवर लँडिंग झालं. सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर हे गेल्या 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवरवर पोहोचले होते. 8 दिवसांचाच त्यांचा हा प्रवास होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना 9 महिने थांबावे लागले. सुनीता विल्यम्स यांची पहिली झलक व्हिडीओच्या माध्यमातून नासाकडून शेअर करण्यात आली असून पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर परतल्या.
सर्व अंतराळवीरांचे कॅप्सूल फ्लोरिडा किनारपट्टीजवळील समुद्रात उतरले. भारतीय वेळेनुसार पाच वाजून 57 मिनिटांनी ते कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरले. अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतण्यासाठी 17 तास लागले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून हे चारही अंतराळवीर 18 मार्च रोजी निघाले होते.
पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर कॅप्सूल भोवतीचं तापमान 1650 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने पृथ्वीच्या वातावरणातून हे कॅप्सूल जमिनीच्या दिशेने येताना कॅप्सूलसोबतचा संपर्क तुटला होता. मात्र थोड्यावेळाने तो पुन्हा प्रस्थापित झाला. त्यानंतर ड्रॅगन फ्रीडम पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर पॅरेशूट्स उघडण्यात आली. पॅराशूट्सची पहिली जोडी कॅप्सूल 18000 फुटांवर उघडली. दुसरी जोडी 6500 फुटांवर उघडली. भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी स्प्लॅश डाऊन झाला.