चिपळूण कोळकेवाडी येथे खून परिसर हादरला
निसार शेख|चिपळूण: कोकणात चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी तांबडवाडीत येथे मोठा खून झाला आहे. खून झालेल्या रवींद्र सुर्वे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत पोलीस रेकॉर्डमध्ये हा सराईत गुन्हेगार आहे. रवींद्र सुर्वे याचा त्याच्या राहत्या घरी गुरुवारी 24 ऑगस्ट रोजी रात्री त्याचा अत्यंत क्रूरपणाने खून करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
रवींद्र सुर्वे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लोखंडी रॉड ने घाव घालून हा खून करण्यात आला आहे. या सगळ्या घटनेची माहिती पोलिस पाटील बचू शिंदे यांनी अलोरे शिरगाव पोलीस यांनी तात्काळ दिली त्यानुसार शिरगाव पोलिस यांनी घटना स्थळी धाव घेतली तसेच चिपळूण पोलिसांना माहिती मिळताच चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी काही संशयित चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.
हत्या करण्यात आलेल्या रवींद्र व त्याचा भाऊ संजय या दोघांवरती ही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तसेच दोन भावाच्या नेहमीचा वादाला कंटाळून त्यांची आई गेली काही दिवस मुंबई येथे राहत आहे. तर बुधवारी रात्री अलोरे मार्केट मध्ये आज मी तुला संपविणार अशी भाषा रवी सुर्वे करत असल्याचे अनेकांनी पाहिले होते तर त्या रात्री चुलते यांच्याकडून त्यांनी दोन भाकऱ्या मागून घेतल्या आणि घरात डुक्कर याचे मटण असल्याचे त्यांनी सांगितले आणि तो परत आपल्या घरी आला पण त्या रात्री नेमके काय घडले असावे याबाबत अद्याप उलगडला झाला नाही मात्र पोलिसांनी त्याचा भाऊ संजय व काही संशयित यांना ताब्यात घेतले आहे.
रवी सुर्वे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड ने मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आहे तर त्याची बॉडी उपडी होती. तर एका बाजूला मोबाईल तर दुसऱ्या बाजूला लोखंडी रॉड पडला होता. घटनास्थळी डॉग स्कॉड, फॉरेन्सिक लॅब टीम स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आदी तपास यंत्रणांना पाचारण करण्यात आल आहे. रवींद्र व संजय हे दोघेही जंगल भागात जाऊन मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. हा खून नेमका कोणी व कशासाठी केला याचा शोध आता पोलीस घेत आहेत. ज्याचा खून झाला त्या रवींद्र सुर्वे ची पत्नी यापूर्वी त्याला सोडून गेली आहे. त्यामुळे घरात या दोघांव्यतिरिक्त कोणी राहत नाही अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. घटनास्थळी परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने तपास करत आहेत.