सध्या व्यक्ती द्वेषाचे राजकारण सुरू आहे,आधी असे नव्हते - जयंत पाटील

सध्या व्यक्ती द्वेषाचे राजकारण सुरू आहे,आधी असे नव्हते - जयंत पाटील

सध्या व्यक्ती द्वेषाचे राजकारण सुरू आहे,आधी असे नव्हते - जयंत पाटील

संजय देसाई, सांगली

व्यक्ती द्वेषाचे राजकारण फार मोठ्या प्रमाणात सुरू झाले असून विरोध करेल त्याच्यावर अनेक आपत्ती आणली जात आहे,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.तसेच महाराष्ट्रातल्या राजकारणातला चित्र दुरुस्त झालं पाहिजे, असे मत देखील जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे,ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये बोलत होते.

राजकारणातील घसरत चाललेल्या पातळी बाबत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे.व्यक्ती द्वेषाचे राजकारण फार मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे.आणि विरोध करेल त्याच्यावर अनेक आपत्ती आणली जात आहे,असं चित्र भारतात उभे राहिले जात आहे.असं पूर्वी नव्हतं.बरेच मैत्रीचे चांगले संबंध असायचे,विरोधात टीका केली तरी दहा मिनिटात एकमेकांच्या गळ्यात गळा घालून फिरणारे विरोधक देखील महाराष्ट्रात आपण 25 ते 30 वर्षात पाहिले आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणातील चित्र दुरुस्त झाले पाहिजे, आणि एकमेकांशी चांगले सबंध ठेवणे आवश्यक आहे,असे आपलेल्या वाटतं, असे मत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com