अतिक अहमद 'शहीद'; काँग्रेस नेत्याची 'भारतरत्न' देण्याची मागणी

अतिक अहमद 'शहीद'; काँग्रेस नेत्याची 'भारतरत्न' देण्याची मागणी

काँग्रेस नेत्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन राजकुमार यांच्यावर सर्वच स्तरावरुन जोरदार टीका करण्यात येत आहे.

प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या काँग्रेसचे नेते राजकुमार उर्फ ​​रज्जू भैया यांनी माफिया अतिक अहमदला शहीद म्हटले आहे. इतकेच नाही तर अतिक अहमद यांना भारतरत्न देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या संबंधित एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन राजकुमार यांच्यावर सर्वच स्तरावरुन जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल होताच कॉंग्रेसने राजकुमार यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली.

अतिक अहमद 'शहीद'; काँग्रेस नेत्याची 'भारतरत्न' देण्याची मागणी
शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार भाड्यांवरती घेणार आणि...; एकनाथ शिंदेंची महत्वपूर्ण माहिती

अतिक अहमद आणि भाऊ अशरफ अहमद यांची वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तिन्ही हल्लेखोरांना घटनास्थळावरून अटक केली. 16 एप्रिल रोजी अतिक-अश्रफ यांना प्रयागराजच्या कासारी-मासारी स्मशानभूमीत दफन करण्यात आले. याठिकाणी राजकुमार यांनी अतिक अहमद यांना शहीद म्हणत भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर प्रयागराज पोलिसांनी राजकुमार यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

तर, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील भर चौकात अतिक अहमद यांचा बॅनर लावण्यात आला होता. त्यावर शहीद असे लिहिले होते. हा बॅनर पाहून नागरिक संताप व्यक्त केला असून याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून बॅनर हटवून दोघांना अटक केली.

दरम्यान, माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. दुसरीकडे, तिन्ही नराधमांना सोमवारी प्रतापगड कारागृहात हलवण्यात आले. त्याचबरोबर पोलिसांनी गुड्डू बॉम्बाझ आणि आतिकची पत्नी शाइस्ता परवीन यांचाही शोध सुरू केला आहे. गुड्डू बॉम्बज हा तोच व्यक्ती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com