हिंगोलीत आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला

हिंगोलीत आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला

काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी तथा विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यात हल्ला झाला.

काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी तथा विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यात हल्ला झाला. प्रज्ञा सातव यांनी स्वतः समाजमाध्यमाद्वारे ही माहिती दिलीय.

आज माझ्यावर अतिशय निर्घृण असा हल्ला झाला. कळमनुरी येथील कसबे धवंडा येथे हा हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने पाठीमागून हल्ला केला. मला गंभीर इजा पोहोचवण्याचा या हल्ल्याचा प्रयत्न होता. एका महिला आमदारावर झालेला हा हल्ला एकप्रकारे लोकशाहीवरचा हल्ला आहे. समोर येऊन वार करा असे भ्याडपणे मागून हल्ला करु नका, अशा शब्दांत प्रज्ञा सातव यांनी या हल्ल्याचा निषेध केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com