Walmik Karad Viral Audio Clip
Walmik Karad Viral Audio Clip

Walmik Karad आणि महिला पोलिसाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, दोघांमध्ये काय झालं संभाषण?

वाल्मीक कराड आणि महिला पोलिस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लीपमध्ये 'मी बीड जिल्ह्याचा बाप आहे' असे वक्तव्य कराडने केलं आहे.
Published by :
Published on

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. मात्र, यानंतर आता बीडमधील गुन्हेगारीचे भीषण वास्तव समोर येत आहे. खंडणीच्या वादातून देशमुखांची हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र, यानिमित्ताने बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह अन्य सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. अशातच आता बीड पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी आणि आरोपी वाल्मिक कराडची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये वाल्मिक कराडने 'मी बीड जिल्ह्याचा बाप' असल्याचं म्हटलं आहे. लोकशाही मराठी या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

वाल्मीक कराड आणि बीड पोलीस दलातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सायबर सेलच्या निशिगंधा खुळे आणि वाल्मीक कराड यांचे हे संभाषण असल्याचं सांगितलं जात आहे. निशिगंधा खुळे या पूर्वी सायबर सेलमध्ये होत्या. आता त्यांची बदली गेवराईला झाली आहे. 'किरकोळ गुन्हा आहे, सोडून द्या. मी बीड जिल्ह्याचा बाप आहे' असा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. मात्र लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

दोघांमध्ये काय झालं संभाषण?

‘किरकोळ गुन्हा आहे. आपलं पोरगं आहे. जाऊद्या द्या सोडून द्या’, असं या क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. तर मी बीड जिल्ह्याचा बाप आहे. मी असल्यावर घाबरायचं काय असाही संवाद या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. लोकशाही मराठी या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

संपूर्ण क्लिप ऐकण्यासाठी क्लिक करा-

(लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com