राज ठाकरेंच्या आदेशानंतर अविनाश जाधव यांचा राजीनामा मागे
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर अविनाश जाधव यांनी हा निर्णय घेतला आहे. काल त्यांनी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांनी आज तो मागे घेतला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने त्यांनी राजिनामा दिल्याचे म्हटले आहे. अविनाश जाधव हे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते. परंतु त्यांचा देखील पराभव झाला होता.
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील तब्बल १२८ उमेदवार राज्यभरात विविध मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र, १२८ उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे या निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसला.