'शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी' राज्य सरकारवर आव्हाडांची टीका

'शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी' राज्य सरकारवर आव्हाडांची टीका

राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी अभियानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी अशा शब्दात जोरदार टीका केली आहे.
Published by  :
shweta walge

राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी अभियानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी अशा शब्दात जोरदार टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राज्यात एकिकडे शेतकरी दुष्काळग्रस्त झालेला असतानाच शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी अशी स्थिती सत्ताधाऱ्यांकडून निर्माण करण्यात आल्याची टीका आव्हाड यांनी केली.

यावेळी त्यांनी गणेशोत्सवात लोकल रेल्वे २४ तास सुरू ठेवण्याची मागणी केली. गणेशोत्सवात अनेक भाविक मुंबई आणि परिसरातील गणेशोत्सवांना भेटी देत असतात. परिणामी घरी परतण्यासाठी वाहनांची उपलब्धता नसल्याने गणेश भक्तांचे हाल होतात. त्यामुळे 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत लोकल रेल्वे 24 तास सुरू ठेवा, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com