Ayodhya Poul Audio Clip Viral : अयोध्या पोळ यांचं वादग्रस्त वक्तव्य; संजय राठोड यांच्याबाबत केलेलं विधान चर्चेत

शिवसेना नेत्या अयोध्या पोळ यांचा एक ऑडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये त्यांनी राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्याबद्दल कडव्या शब्दांत भाष्य केल्याचे ऐकायला मिळत आहे.
Published by :
Team Lokshahi

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाच्या नेत्या अयोध्या पोळ यांचा एक ऑडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये त्यांनी राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्याबद्दल कडव्या शब्दांत भाष्य केल्याचे ऐकायला मिळत आहे. या क्लिपमध्ये त्यांनी "भर चौकात चपलेने मारलं पाहिजे", अशा प्रकारचं वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ही क्लिप राठोड समर्थक उमेश राठोड आणि अयोध्या पोळ यांच्यातील संभाषण असल्याचे सांगितले जाते. संभाषणात राठोड यांच्या एका जुन्या प्रकरणाचा संदर्भ देत अयोध्या पोळ यांनी अत्यंत तीव्र भाषा वापरली असून, राठोड यांच्यावर चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांचाही उल्लेख केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अशा व्यक्तींना जनतेसमोर जाब विचारला गेला पाहिजे.

दरम्यान, हे ऑडिओ क्लिप खरी आहे की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झाली नाही. हे प्रकरण उफाळून आल्याने आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा

Ayodhya Poul Audio Clip Viral : अयोध्या पोळ यांचं वादग्रस्त वक्तव्य; संजय राठोड यांच्याबाबत केलेलं विधान चर्चेत
Raj Thackeray - Uddhav Thackeray Reunion : नव्या युतीची नांदी!; 'आम्ही वाट बघतोय...', राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्रित पत्र
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com