राम मंदिराबाबत मोठी बातमी, 'या' दिवशी मूर्ती स्थापनेने होणार दर्शनाला सुरुवात

राम मंदिराबाबत मोठी बातमी, 'या' दिवशी मूर्ती स्थापनेने होणार दर्शनाला सुरुवात

अयोध्येतील राम मंदिराबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अयोध्येतील राम मंदिराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राम मंदिर उभारणीचे काम वेगाने पूर्ण होत आहे. मंदिराचे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी माहिती दिली आहे. मंदिराचे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. जानेवारी 2024 च्या तिसर्‍या आठवड्यात रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल आणि त्याच दिवसापासून भाविकांना दर्शन आणि पूजा करण्याची व्यवस्था केली जाईल.

स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे आयोजित एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांना सांगितले की, जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम लल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने पूर्ण होत आहे. ते म्हणाले की, रामलल्लाची मूर्ती मंदिरात स्थापित करण्यापूर्वी बराच काळ कापडी पंडालमध्ये ठेवण्यात आली होती. लवकरच त्यांना भव्य ठिकाणी हलवण्यात येणार आहे. मूर्तीच्या स्थापनेनंतरही राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com