Zeeshan Siddique Death Threat : झीशान सिद्दीकीकडे 10 कोटींची मागणी; 'डी कंपनी'च्या मेलवरून मिळाली जीवे मारण्याची धमकी

Zeeshan Siddique Death Threat : झीशान सिद्दीकीकडे 10 कोटींची मागणी; 'डी कंपनी'च्या मेलवरून मिळाली जीवे मारण्याची धमकी

तो दर सहा तासांनी असे ईमेल पाठवेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Published by :
Rashmi Mane
Published on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते आणि बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकीला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, धमकीच्या ईमेलमध्ये म्हटले होते की, "त्याला त्याच्या वडिलांप्रमाणेच 'त्याच प्रकारे' मारले जाईल. पाठवणाऱ्याने सिद्दीककडून 10 कोटी रुपयांची मागणीही केली आहे. तसेच, पाठवणाऱ्याने पुढे सांगितले की तो दर सहा तासांनी असे ईमेल पाठवेल."

दरम्यान, एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना झीशान सिद्दीकीने दावा केला की, त्याला मिळालेला जीवे मारण्याची धमकीचा ईमेल डी कंपनीकडून पाठवण्यात आला होता आणि त्यांनी 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. झीशान सिद्दीकीने म्हटले की, "मला डी कंपनीकडून मेलद्वारे धमकी मिळाली, मेलच्या शेवटी नमूद केल्याप्रमाणे, त्यांनी 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी तपशील घेत जबाब नोंदवला आहे. मात्र यामुळे आमचे कुटुंब अस्वस्थ आहे."

12 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील निर्मल नगर येथील त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाजवळ तीन हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com