"शिशुपालाच्या शंभर अपराधाचा घडा भरला, आघाडीच्या आमदारांचा पोळा फुटला"

"शिशुपालाच्या शंभर अपराधाचा घडा भरला, आघाडीच्या आमदारांचा पोळा फुटला"

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी ही टीका केली आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

मुंबई | रवि जयस्वाल : शिवसेनेसह आघाडीच्या आमदारांचा पोळा फुटल्याचं म्हणत जालन्यात भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी जल्लोष साजरा केलाय. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अशातच मंत्री एकनाथ शिंदे सोमवारपासून नॉट रिचेबल आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदारही संपर्कात नाही. त्यानंतर हे सर्व गुजरातच्या सुरत येथे असल्याचं समोर आले. त्यातच आता एकनाथ शिंदे आज (21 जून ) संध्याकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आपल्या 35 समर्थक आमदारांसोबत सुरतमध्ये असून ते आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. याचदरम्यान संध्याकाळी केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. ही बैठक अहमदाबादमध्ये होणार तसेच भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील हे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या भेटीला गेले आहेत.

विधानपरिषदेनंतर शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे अनेक आमदार फुटलेत.. त्यानंतर राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे.. त्यामुळं एक दिवस नाराज आमदारांचा पोळा फुटेल असं भाकीत लोणीकर यांनी अनेकवेळा केलं होत ते आज खरं होताना दिसतंय.. त्यामुळं शिशुपालाचा शंभर अपराध भरले असून त्यांच्या ओझ्यानच हे सरकार पडेल असं लोणीकर यांनी म्हंटलंय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com