‘जॉन्सन बेबी पावडर’चा परवाना कायमचा रद्द

‘जॉन्सन बेबी पावडर’चा परवाना कायमचा रद्द

बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या जॅान्सन अँड जॉन्सन प्रा.लि ची ‘जॉन्सन बेबी पावडर’ या सौंदर्य प्रसाधनाचा उत्पादन परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे.

बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या जॅान्सन अँड जॉन्सन प्रा.लि ची ‘जॉन्सन बेबी पावडर’ या सौंदर्य प्रसाधनाचा उत्पादन परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. हा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. जॉन्सन बेबी पावडर’चे नमुने नाशिक व पुणे येथील औषध निरीक्षकांनी गुणवत्ता चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र या पावडरच्या नमुण्यांमध्ये दोष असल्याचे दिसल्याने त्यांचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे.

‘जॅान्सन बेबी पावडर’चा प्रामुख्याने नवजात बालकांसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याच्या वापराने नवजात शिशु व लहान मुलांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीच्या मुलुंड उत्पादन कारखान्याचा “जॅान्सन बेबी पावडर” या उत्पादनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. कंपनीने केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून फेरचाचणी होण्यासाठी नाशिक व पुणे न्यायालयात अर्ज केला होता. केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून ही फेरचाचणी करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, कोलकत्ता येथील केंद्रीय औषध प्रयोगशाळेने या नमुन्यांची चाचणी अप्रमाणित घोषित केली.

गेल्या अनेक वर्षांपासून जॉन्सन अँण्ड जॉन्सन कंपनी भारतात आपल्या उत्पादनांची विक्री करत आहे. लहान बाळांसाठी वापरण्यात येणारी या कंपनीची उत्पादने भारतीय बाजारपेठेत प्रचंड लोकप्रिय होती. ‘जॉन्सन्स बेबी टाल्कम पावडर’ या लोकप्रिय बालप्रसाधन उत्पादनात प्रमाणाबाहेर आलेले जीवाणू कमी करण्यासाठी कॅन्सरप्रवण अशी निर्जंतुकीकरण प्रक्रिया केल्याच्या आरोपावरून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या सर्व प्रसाधनांचा उत्पादन परवाना रद्द केला.

Lokshahi
www.lokshahi.com