Bacchu Kadu : 'प्रस्थापितांची झोप उडेल, दिल्लीचाही थरकाप उडेल...'; बच्चू कडूंची 'ती' पोस्ट Viral, सरकारला इशारा

Bacchu Kadu : 'प्रस्थापितांची झोप उडेल, दिल्लीचाही थरकाप उडेल...'; बच्चू कडूंची 'ती' पोस्ट Viral, सरकारला इशारा

हिंदी सक्तीविरोधातील मनसेच्या लढ्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना समील झाल्यानंतर अनेक पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे.
Published by :
Rashmi Mane
Published on

राज्यात हिंदी सक्तीविरोधातील लढा आणखी बळकट होत आहे. येत्या ५ जुलै रोजी होणाऱ्या हिंदी सक्तीविरोधातील मनसेच्या लढ्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना समील झाल्यानंतर अनेक पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यातच आता प्रहार संघटनेने नेते बच्चू कडू यांनीदेखील मराठी भाषेसाठीच्या मोर्चाला पाठिंबा असल्याची एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी राज आणि उद्धव ठाकरेंसोबत स्वतःचाही फोटो पोस्टसोबत शेअर केला असून महाराष्ट्रासाठी लढणारा आवाज आणखी बुलंद होत आहे, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

काय आहे पोस्टमध्ये --

प्रस्थापितांची झोप उडेल,

दिल्लीचाही थरकाप उडेल...

असा हा लढा महाराष्ट्र लढतोय!

मायमराठीच्या स्वातंत्र्याचा!

मायबाप शेतकऱ्यांच्या हक्काचा!

भाषा, भूमी, शेतकरी, कष्टकरी...

महाराष्ट्रासाठी लढणारा आवाज आणखी बुलंद होत आहे!

मराठीच्या मोर्चाला आमचा पाठिंबा आहे!

तो असलाच पाहिजे!

हेही वाचा

Bacchu Kadu : 'प्रस्थापितांची झोप उडेल, दिल्लीचाही थरकाप उडेल...'; बच्चू कडूंची 'ती' पोस्ट Viral, सरकारला इशारा
Shefali Jariwala : बायकोच्या अस्थी हातात घेताच परागला रडू कोसळलं, Video पाहून नेटकरीही झाले Emotional
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com