Bachchu Kadu
Bachchu KaduTeam Lokshahi

खासदार नवनीत राणा यांची डोकेदुखी वाढणार? नवनीत राणा यांच्या अमरावती मतदारसंघावर बच्चू कडू यांचा दावा

नवनीत राणा यांच्या अमरावती मतदारसंघावर बच्चू कडू यांनी दावा केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

नवनीत राणा यांच्या अमरावती मतदारसंघावर बच्चू कडू यांनी दावा केला आहे. देभभरातील सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातही भाजपा, शिंदे गटासह त्यांच्या मित्रपक्षांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता बच्चू कडूंनी एका माध्यमाला प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, आम्ही एकूण 15 ते 20 जागा विधानसभेसाठी लढवणार आहोत. त्यात अमरावती जिल्ह्यातील मेहगाव आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघ आहेत. विधानसभेच्या 15 ते 20 जागा लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. लोकसभेची एक जागा लढवणार आहे.

आम्हीही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. युतीची शक्यता आहे. एकत्र लढण्याची आमची तयारी आहे.आमची तयारी आहे. मी स्वत: अमरावती लोकसभा मतदारसंघातून लढलो होतो. आम्ही अमरावतीची जागा लढवणार आहोत. आम्ही अमरावतीसाठी आग्रही आहोत. ही जागा आम्ही सोडणार नाही. या मतदारसंघात कुणाशीही फाईट झाली तरी आम्ही लढू. असे बच्चू कडू म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com