Bachchu Kadu
Bachchu Kadu Team Lokshahi

बच्चू कडूंनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केला मोठा खुलासा; बोलता बोलता सरळ सांगून टाकले...

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राज्यात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती.

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राज्यात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच या बंडखोरीमुळे शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केले.

या शिंदे- फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र, तरीही या सरकारचा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार अद्याप झाला नाही. याबाबत आता शिंदे गट समर्थक आमदार बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे.

मला नाही वाटत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.. मंत्रिमंडळाचा विस्तार आता २०२४ नंतरच होईल. मनसे सत्तेत येऊ शकते, त्यांचा एकच आमदार आहे. जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यांना मंत्रिपद मिळाल तर नक्कीच राज ठाकरे सत्तेत येतील. असे बच्चू कडू म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com