Bacchu Kadu On NCP Event Lavani : दादांच्या कार्यालयात 'वाजले की बारा'वर ठेका! "शेतकरी मरत असेल पण...अजित पवार नाचवू शकतात" NCPच्या लावणीवर बच्चू कडूंची टीका
नागपूरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमात महिला कार्यकर्त्याकडून लावणी सादर केल्यामुळे नव्या वादाची ठिणगी पेटली आहे. अजित पवार यांच्या हस्ते या कार्यालयाचे दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लावणी सादर झाल्याने वाद निर्माण झाला आहे.
ती लावणी सादर करणाऱ्या महिला पक्ष कार्यकर्त्या शिल्पा शाहीर असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी सांगितले आहे. लावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी त्यांना फोन केल्याचंही अहिरकर यांनी स्पष्ट केले.
लावणी सादर करण्यासाठी कोणत्याही बाहेरील कलाकारांना बोलवण्यात आले नव्हते. पक्षाचे कार्यकर्ते दिवाळी मिलनाच्या निमित्ताने आपली कला सादर करत होते, असेही अहिरकर यांनी सांगितलं.
याचपार्श्वभूमिवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, "लावणी राष्ट्रवादीच्या कार्यालयात होती काही ट्रायल होती का? असा प्रश्न बच्चू कडून उपस्थित केला. एखाद्या पक्ष कार्यालयात काय असावं काय नसावं तो पक्षाचा निर्णय आहे. एकीकडे शेतकरी मरत असेल आणि दुसरीकडे लावणी कार्यक्रम होत असेल तर ते चुकीचा आहे. हे जखमेवर मीठ चोळण्याचे काम आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे भक्कम पैसे आहेत.. ते काहीही नाचवू शकतात.. अजित पवार पैशाच सोंग करू शकत नाही पण नाचवू शकतात ".

