Bacchu Kadu : नवनीत राणांच्या पराभवामागे रवी राणा यांचा मोठा हात आहे

Bacchu Kadu : नवनीत राणांच्या पराभवामागे रवी राणा यांचा मोठा हात आहे

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांचा पराभव झाला तर काँग्रेसचे नेते बळवंत वानखेडे यांचा विजय झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

यातच आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, पराभवामागे रवी राणा यांचा मोठा हात आहे. रवी राणा यांची वर्तवणूक, त्यांचे प्रत्येकासोबत केलेलं वाद. काहीजण आपल्या कर्माने पडतात. त्याच एक हे मोठं उदाहरण आहे. अशावेळेस माझ्यासारख्या माणसाला घरात येऊन मारु. या सगळ्या वातावरणामध्ये दिनेश बूबसारखा चांगला कार्यकर्ता आम्हाला भेटला. असे बच्चू कडू म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com