शरद पवार यांच्या दंगलीबाबतच्या विधानावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ऐक्य परिषदेत शरद पवार बोलत होते.

नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ऐक्य परिषदेत शरद पवार बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजुबाजूच्या राज्यात घडलं, खाली कर्नाटकात घडले. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याची चिंता वाटते आहे. असे शरद पवार म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, मणिपूरची वस्तुस्थिती फारच वेगळी आहे. मणिपूर एकदम छोटं राज्य आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी असणारा राज्य असल्यामुळे पवार साहेबांनी कसं ते विधान केलं, कुठल्या आधारावर केलं मला ते माहित नाही. असे बच्चू कडू म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com