बच्चू कडू आक्रमक; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वरून बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. बच्चू कडूंची प्रहार संघटना संपूर्ण महाराष्ट्रात सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर आज रात्री 12 वाजता मशाल पेटून आंदोलन करण्यात येणार.
नाशिक मध्ये आज कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर स्वतः बच्चू कडू मशाल घेऊन आंदोलन करणार आहेत. दिवसा शेतकरी या सरकारला दिसत नाही म्हणून रात्री मशाल घेऊन आंदोलन करणार तेव्हा तरी आम्हाला पहा असे बच्चू कडू यांनी टीका केली आहे.
याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू म्हणाले की, सत्ताधारी आमदारांच्या समोर महाराष्ट्रभर शेतकरी आणि कार्यकर्ता मिळून हे आंदोलन करणार. शेतकऱ्याच्या घरातला दिवा गेला, वात गेली. दिवसा शेतकरी या सरकारला दिसत नाही म्हणून रात्री शेतकरी टेंबा घेऊन आम्हाला आतातरी पाहा. याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे. आता ते जर आम्हाला तारखा देत असतील तर तारखाची वाच आम्ही पाहणार नाही. हे आंदोलनाचे पहिलं दुसरं स्वरुप आहे. या आंदोलनाची उद्रता आम्ही दिवसेंदिवस वाढवू. माणिकराव कोकाटेंना आम्हाला समजावून सांगायचे आहे, तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहेत. हे त्यांचे काम आहे. त्यांनी कसा हा शेतकऱ्यांचा प्रश्न सरकारमध्ये आणता येईल हे काम त्यांनी केलं पाहिजे. असे बच्चू कडू म्हणाले.