ताज्या बातम्या
Bacchu Kadu Protest Called Off : उदय सामंतांची शिष्टाई फळाला, बच्चू कडूंचं आंदोलन स्थगित
शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात 90% मागण्या सरकारने मान्य केल्यामुळे बच्चू कडूंनी त्यांच सुरु असलेले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे.
बच्चू कडू यांनी 7 जून 2025 पासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतमजुरांसाठी आर्थिक सहाय्य, आणि दिव्यांग-विधवांसाठी 6,000 रुपये मानधन यासह 14 मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. महाराष्ट्रात कष्टकरी, शेतकरी, विधवा, दिव्यांग, कोकणातील कोडी व मेंढपाळांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केलं.
या लढ्याला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत असून अमरावतीपासून मुंबईपर्यंत आंदोलनांची लाट उसळली. शेतकरी कर्जमाफी, शेतमजूर, आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात 90% मागण्या सरकारने मान्य केल्याचे कडू यांनी जाहीर केले. आज प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी सात दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे.