बच्चू कडू यांनी दिला दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा, कारण सांगत म्हणाले...
बच्चू कडू यांनी दीव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. दिव्यांग मंत्रालया बाबत सरकारचे उदासीन धोरण आल्याची कडू यांनी टीका केली आहे. आपली राज्यमंत्री म्हणून असलेली सुरक्षा काढून टाकण्याची पत्रात विनंती बच्चू कडू यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे.
दिव्यांग मंत्रालयाबाबत बच्चू कडू यांचा आक्षेप खालील प्रमाणे
१. इतर राज्यांपेक्षा दिव्यांगाना महाराष्ट्रा मध्ये मिळणारे मानधन सर्वात कमी आहे.
२. मिळणारे मानधन वेळेवर कधीच मिळत नाही.
३. स्थानिक स्वराज्य संस्था ५% निधी खर्च करत नाही.
४. अजूनही स्वतंत्र मंत्री नाही आणि सचिव पण नाही.
५. जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय नाही. पद भरती नाही.
६. इतर अनेक गोष्टी ज्या झाल्या नाही.
या पदावर राहून ते होणार अशी शक्यता मावळली आहे. म्हणून दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलने करावी लागणार पदावर राहून आंदोलन करणे शक्य नाही, दिव्यांगासोबत बेईमानी कदापि शक्य नाही. म्हणून मी माझा राजीनामा देत आहे. तो मंजूर करून सहकार्य करावे तसेच मला असलेली सुरक्षा सुद्धा काढून टाकावी कुठलीही सुरक्षा ठेवण्यात येऊ नये.