'जातीच्या प्रश्नाला हात घालून सरकारनं देशाचा सत्यानाश केला' बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर

'जातीच्या प्रश्नाला हात घालून सरकारनं देशाचा सत्यानाश केला' बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर

सरकारनं मूळ प्रश्न सोडून जातीच्या प्रश्नाला हात घातला आणि देशाचा सत्यानाश केल्याचा आरोप माजी मंत्री बच्चू कडूंनी केला आहे
Published by :
shweta walge

सरकारनं मूळ प्रश्न सोडून जातीच्या प्रश्नाला हात घातला आणि देशाचा सत्यानाश केल्याचा आरोप माजी मंत्री बच्चू कडूंनी केला आहे. आरक्षणाच्या प्रश्नाबाबत बोलताना बच्चू कडूंनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

आज जे जातीचे लोक आरक्षणासाठी भांडत आहे तेच जर शेतीचे प्रश्न सुटले असते तर कोणीच आरक्षण मागितलं नसतं. एवढी ताकद शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये होती. मात्र ते सोडता आली नाही. यामध्ये सरकार अपयशी ठरलं असल्याचं ते म्हणाले.

सगळ्या समाजामध्ये 75 टक्के शेतकरी आहे, शेतकरी आणि मजूर या दोन प्रश्नाला जर व्यवस्थित हात लावता आला असता तर जातीच आरक्षण कोणी मागितलं नसतं. इथली व्यवस्था बदलण्याच कारण सरकार आहे. सरकारनं मुळ प्रश्न सोडून जातीच्या प्रश्नाला हात लावला व या देशाचा सत्यानाश करून टाकला अशी बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली.

दरम्यान, सरकारकडून मराठ्यांची फसवणूक होते आहे. मराठ्यांच्या नादी लागू नका. तुमच्याकडे 24 तारखेपर्यंतचा वेळ आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. तसेच, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धारही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील राजगुरूनगरमध्ये जरांगेंची जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com