ताज्या बातम्या
बदलापूर अत्याचार प्रकरण; निलंबित झालेले ठाण्याचे शिक्षणाधिकारी भाळासाहेब राक्षे यांची उच्च न्यायालयात धाव
बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.
बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याच पार्श्वभूमीवर अत्याचाराच्या घटनेनंतर निलंबित करण्यात आलेले ठाण्याचे शिक्षणाधिकारी भाळासाहेब राक्षे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
निलंबनाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. आपल्याला या प्रकरणी नाहक गोवण्यात आले असून आपल्यावरील निलंबनाची कारवाई ही राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा राक्षे यांनी केल्याची माहिती मिळत आहे.
राक्षे यांनी सुरूवातीला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे निलंबनाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. मात्र परंतु, न्याधिकरणाने कोणताही दिलासा न दिल्याने राक्षे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.