Satara : देशातील सर्वात मोठी साताऱ्यातील बगाड यात्रेला सुरुवात, बगाड म्हणजे काय? जाणून घ्या..
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रेमध्ये बावधन यात्रेचा समावेश असतो. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामधील बाबधन गावामध्ये ही यात्रा भरली जाते.या यात्रेमध्ये लाखो भाविक सहभागी होतात. इंग्रज भारतात येण्या आधीपासून या यात्रेची पंरपरा चालत आली आहे. फाल्गुन शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण गावातील भक्त मंडळीकडून गावचं मंदिर साफ-सफाई आणि धुण्याचं काम सुरु होतं यालाच पाकळणी म्हणतात. होळी पौर्णिमेपासून बावधनच्या यात्रेला सुरुवात होते. तसेच रंगपंचमी दिवशी बगाड भरतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक हे बगाड पाहण्यासाठी येत असतात.
बाबधनच्या बगाडबद्दल सांगयचे झाले तर, ते पूर्ण लाकडापासून तयार केले जाते. त्याचप्रमाणे बगाड ओढण्यासाठी फक्त खिल्लार बैल वापरण्याची प्रथा आहे. कारण खिल्लार बैलामध्ये बाकीच्या बैलापेक्षा जास्त ताकद असते. बाबधन गावामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या घरी एकतरी धिपाड खिल्लारी बैल पाहायला मिळतो. यादिवशी गावामध्ये प्रत्येकाच्या घरी पुरणपोळीचे जेवण बनवले जाते. बगाड्या बगाडवरुन सुखरुप खाली उतरला की, गावातील महिला त्यांची आरती करतात. त्यांच्या पाया पडतात. तसेच बगाडाला हळदी- कुंक लावून पुजा करतात. बगाड यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले जाते. प्रत्येकाच्या घरी पाहुण्याची ये-जा सुरु असते. मासांहाराच्या जेवणाचा बेत प्रत्येकांच्या घरी आखला जातो. सासरी गेलेल्या मुली माहेरपणासाठी या यात्रेनिमित्त येतात. मुंबई- पुण्याला राहणारी माणसे गावाकडे येतात. या दोन-दिवसांमध्ये प्रत्येकाचं घर माणसांने भरलेले दिसते.
बागड म्हणजे काय?
वाई तालुक्यातील बाबधन यात्रेचं वैशिष्टय महत्त्व आहे. भैरवनाथ आणि नाथांची पत्नी जोगूबाई यांच्या लग्नाचा दिवस पाहून ही यात्रा भरवली जाते. या यात्रेचे बगाड पूर्ण लाकडापासून तयार केले जाते. त्याचे वजन किमान 2-3 टन एवढे असते. या बगाडामध्ये कुठेही लोखंडाचा वापर केला जात नाही. बाबधन गावातील सुतार समाजाची व्यक्ती यात्रेच्या 8-10 दिवस आधी 24 तास काम करुन हे बगाड तयार केले जाते.
बगाड्या कसा निवडला जातो?
होळीपौर्णिमेच्या दिवशी गावातील सर्व व्यक्ती गावातल्या मंदिरात जमा होतात. ज्या व्यक्तींचा नवस पूर्ण झाला आहे. त्याच्या नावाची पाने बनवली जाते. त्यानंतर भैरवनाथाच्या मुर्तीसमोर ती पाने ठेवली जातात. ज्या व्यक्तीच्या नावाचे पान पडते. तो व्यक्ती बगाड्या म्हणून घोषित होते. यात्रेच्या दिवशी त्या व्यक्तीला बगाड्याला लटकवले जाते. जो व्यक्ती बगाड्या होतो. त्याच्या घरी कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही अशी, नागरिकांची समज आहे.
बगाड प्रवास कसा असतो?
बगाड हे प्रामुख्खाने 75 टक्के शेतातून तसेच 25 टक्के शेतातून प्रवास असतो. शेतामध्ये पीक काढल्याने माती ओली आणि भुसभुशीत असते. खिल्लारी बैल बगाड ओढण्याची पंरपरा आहे. ज्या व्यक्तीच्या शेतातून बगाड चालते त्या व्यक्तीच्या शेतामध्ये पीक जोमात येते अशी, गावकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे बगाड नेण्यासाठी गावकरी उत्सुक असतात.