साईबाबा देव नाहीत; पंडित धीरेंद्र शास्त्रींचे वादग्रस्त वक्तव्य

साईबाबा देव नाहीत; पंडित धीरेंद्र शास्त्रींचे वादग्रस्त वक्तव्य

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात असलेले बागेश्वर धाम धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पुन्हा एकदा साईबाबांविरोधात मोठं वक्तव्य केलं आहे

जबलपूर : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात असलेले बागेश्वर धाम धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पुन्हा एकदा साईबाबांविरोधात मोठं वक्तव्य केलं आहे. जबलपूर येथील पानगर येथे शनिवारी आयोजित श्रीमद भागवत कथेच्या शेवटच्या दिवशी धीरेंद्र शास्त्री लोकांशी संवाद साधत होते. यादरम्यान त्यांना साईपूजेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी साईबाबांना देव मानण्यास नकार दिला. जर कोणी सिंहाची कातडी घातली तर तो सिंह होत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

साईबाबा देव नाहीत; पंडित धीरेंद्र शास्त्रींचे वादग्रस्त वक्तव्य
...तर भाजपने अहमदनगरचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर करून दाखवावं; अंधारेंचे थेट आव्हान

धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, साईबाबा संत किंवा फकीर असू शकतात, परंतु देव नाही. सनातन धर्म हा शंकराचार्यांच्या तत्त्वांवर चालतो आणि ते हिंदू धर्माचे पंतप्रधान आहेत. त्यांनी साईबाबांना कधीच देवतेचा दर्जा दिला नाही. म्हणूनच ते साईबाबांनाही देव मानत नाही. साईबाबा तुलसीदासांपेक्षा श्रेष्ठ असू शकत नाहीत. पण तुलसीदास किंवा सूरदास यांनाही युगपुरुष म्हटले आहे. तसेच इतर धर्मातही युगपुरुष असू शकतात. त्याला देव कसे म्हणता येईल किंवा मानता येईल. जर ते छत्री घेऊन बसले तर त्यांना शंकराचार्य मानले जाईल का, असे प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

साईबाबांबाबत निर्माण झालेले सर्व वाद आता संपुष्टात आले होते. मात्र, धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यामुळे पुन्हा वादांना तोंड फुटले आहे. या वक्तव्यावर लवकरच साईबाबांच्या समर्थकांची प्रतिक्रिया उमटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जबलपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्रींनी लवकरच ते ब्रिटिशांची खिल्ली उडवण्यासाठी अमेरिकेला जात आहेत, असे सांगितले होते. कॅलिफोर्नियाहून आलेल्या एका भक्ताशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यात 15 ऑगस्टला त्यांना अमेरिकेत ध्वजारोहणाचे निमंत्रण मिळाल्याचे सांगण्यात आले. या कथेदरम्यान धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनीही दरबार भरवून भाविकांशी संवाद साधला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com