शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील शिवसेना भवन चारही बाजूंनी रंगीबेरंगी रोषणाईने सजले आहे. या निमित्तानं दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर फुलांनी सजावट करण्यात आली आहे. आजच्या दिवशी स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी अनेक शिवसैनिक, कार्यकर्ते, मान्यवर दाखल होत आहेत.

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज्यभरात शिवसैनिकांकडून विविध कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये रक्तदान शिबिरे आणि इतर सार्वजनिक उपक्रमांचा प्रामुख्याने समावेश असतो.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्ष आज प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती करणार असल्याची घोषणा करण्यात येणार आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती
आज उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार

मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचं जाहीर केलं होतं. याच दिवसाचं औचित्य साधत आज विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरणही करण्यात येणार आहे. या तैलचित्राच्या कार्यक्रमासाठी ठाकरे कुटुंबातील सगळ्यांनाच निमंत्रित करण्यात आलं आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती
बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचितच्या युतीची आज घोषणा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com