Balasaheb Thackeray : "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो..." बाळासाहेबांचा दमदार नाशिकमध्ये घुमला
आज नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निर्धार शिबीर सुरु आहे. या दरम्यान सुरु असलेल्या शिबीरीत राज्यातील शिवसैनिकांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न करण्यासाठी ही शिबीर आयोजीत करण्यात आली. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अनेक कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
यासाठीच ठाकरे गटाकडून निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची सुरुवात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आभासी भाषणाने झाली. दसरा मेळावा म्हटलं की, डोळ्यासमोर येतात ते कणखर बाणा असलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांसारखा तोच आवाज, तोच करारी बाणा, ठस करून काळजात भिडणारे शब्द या आभासी भाषणात ऐकायला मिळतात. त्यामुळे डोळ्यासमोर असं भासत होत, जणू काही बाळासाहेब ठाकरे स्वत: व्यासीपाठावर उभे राहून भाषण करत आहेत.
या भाषणात बाळासाहेबांच्या आवाजात भाजपवर टोला लगावण्यात आला आहे. कमळाबाई म्हणजे ढोंग आहे, भाजपला आम्ही महाराष्ट्रात खांदा दिला, खांदा दिला म्हणजे आधार दिला, असं म्हणत भाजपवर हल्लाबोल केला. तसेच यावेळी निवडणूकीत लागलेला निकाल तुम्हाला मान्य आहे का..? असा सवाल देखील करण्यात आला आहे. तसेच शिवसेना ठाकरे पक्षातून ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यांच्यासह एकनाथ शिंदेना, गद्दारांनो याद राखा तुमचे निच मनसुबे पुर्ण होणार नाही, असं म्हणण्यात आलं आहे. तसेच