Balasaheb Thorat
Balasaheb ThoratTeam Lokshahi

बाळासाहेब थोरात यांना भाजपाकडून खुली ऑफर

नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात यांचा वाद विकोपाला गेला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात यांचा वाद विकोपाला गेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. आता बाळासाहेब पुढे कोणत्या निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर राम शिंदे शुक्रवारी नगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांनी भाजपात येण्याची खुली ऑफर दिली आहे. ते म्हणाले की, भाजप हा देशात सर्वात मोठा पक्ष आहे.यामुळे कोणत्याही पक्षातील कोणी नेते दु:खी,किंवा अडचणीत असतील त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांना भाजप आसरा देण्यासाठी तयार आहे.

यातच काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावर भाष्य केले होते की, बाळासाहेब थोरात असो किंवा अजून कोणतेही नेतृत्वाला प्रवेश करण्यास भाजपचे दरवाजे खुले आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com