बाबासाहेबांचे विचार पुसण्याचे काम देशात सुरू - बाळासाहेब थोरात
Admin

बाबासाहेबांचे विचार पुसण्याचे काम देशात सुरू - बाळासाहेब थोरात

भारतीय राज्यघटनेचे स्वत्रंत अबधित राहीले पाहिजे भारतरत्न डॉ.बाबासिहेब आंबेडकर यांना हेच अभिवादन ठरेल.

आदेश वाकळे, संगमनेर

भारतीय राज्यघटनेचे स्वतंत्र अबधित राहीले पाहिजे भारतरत्न डॉ.बाबासिहेब आंबेडकर यांना हेच अभिवादन ठरेल.असे माजी मंत्री थोरात यांनी संगमनेमधील एका कार्यक्रमात सांगितले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132 वी जयंती, पूर्ण देशात व राज्यात अतिशय उत्साहाने साजरी होत आहे. त्याच अनुषंगाने संगमनेर तालुक्यात सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साह साजरी करण्यात आली.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते त्यांनी सांगितले की आज राज्यघटनेचे स्वातंत्र धोक्यात आलेले आहे. आपल्या सर्वांना एक शपथ घ्यावी लागेल की येणारा काळ अतिशय बिकट आहे. काही राज्यकर्ते हे घटनेची शपथ घेतात व राज्यघटने विरुद्ध काम करत आहे. त्यामुळे देशातील व्यक्ती स्वातंत्र्याला व राज्यघटनेला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे आपल्या सर्वांना एकजुटीने एकत्र येऊन या विरोधाचा सामना करावा लागेल व आपली राज्यघटनाचे स्वातंत्र्य अबाधित राखावे लागेल असे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना मांडले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com