हे सरकार 2024 ला पूर्णपणे कोसळेल  - बाळासाहेब थोरात

हे सरकार 2024 ला पूर्णपणे कोसळेल - बाळासाहेब थोरात

संगमनेरमध्ये कॉग्रेसचे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन व रास्ता रोकोत थोरात सहभागी झाले होते.

आदेश वाकळे, संगमनेर

संगमनेरमध्ये कॉग्रेसचे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन व रास्ता रोकोत थोरात सहभागी झाले होते. यावेळी सरकारवर सडकुन टीका थोरातांनी केली आहे. शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडू नयेत, तसेच शेतीला दिवसा १२ तास वीजपुरवठा करावा, कांद्याना हमीभाव मिळावा व शासनाने तो खरेदी करावा, अशा विविध प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडीच्या वतीने कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या बोलेकिल्लात म्हनजेच संगमनेरमध्ये हे आंदोलन सुरू होते.

जाहिरात बाजीवर कुणीही गतिमान होत नसतं हे सरकार 2024 ला पूर्णपणे कोसळेल असा इशारा कांग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर या ठिकाणी दिलेला आहे. सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाहीयेत भाषण मात्र मोठ-मोठी करतात व सुंदर करतात असे देखील थोरात यांनी सांगितलय. पुण्याच्या पोटनिवडणुकीतून जनमत हे भाजप व शिंदे सरकारच्या विरोधात गेले असल्याचे देखील बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले संगमनेर मध्ये ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com