Balasaheb Thorat | 'राज्यातील राजकारणाचा स्तर खालावलाय'; थोरातांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जे राजकारण सुरू आहे हे खूप दुर्दैवी असून महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही असा महायुतीला टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता लगावला आहे.
Published by :
shweta walge

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जे राजकारण सुरू आहे हे खूप दुर्दैवी असून महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही असा महायुतीला टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता लगावला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर नवी मुंबई येथे मिठ्या मारल्या गुलाल उधळला त्याचं काय झालं याचं देखील उत्तर द्यावं लागेल तसेच काही भागाला जास्त निधी व काही भागाला अतिशय तुटपुंजा निधी व त्यात झालेला भ्रष्टाचार यावर देखील थोरात यांनी ताशेरे ओढले आहेत. ते संगमनेर येथे पत्रकारांशी बोलत होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com