Bangladeshi Arrested: मुंबईत घाटकोपर पोलिसांची मोठी कारवाई, 13 बांगलादेशींना अटक
पोलिसांनी एका दिवसात मुंबईच्या घाटकोपर पोलिसानी आज तब्बल १३ बांगलादेशी नागरिक अटक केले आहे. हे सर्व १३ आरोपी नागरिक नालासोपाऱ्याच्या अचोले विभागात अनधिकृतपणे राहत होते. गेल्या महिन्यात घाटकोपर पोलिसानी मोहम्मद अली शेख या बांगलादेशी आरोपीला गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली होती.
13 जणांमध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश
या 13 जणांमध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यात मिळालेल्या माहितीच्या आधारे तैबूर अजगर शेख, आलम अजगर शेख, मिजानू सलाम शेख, अब्दुल सिराज शेख,मुराद मिजानूर शेख, रत्ना तैबुर शेख,अमीना मुराद शेख,सबिना अब्दुला शेख, कोहिनूर मिजानूर शेख यांच्यासह चार अल्पवयीन मुले अश्या तेरा जणाना अटक केली आहे.
भारताची सीमा ओलांडून भारतात आले
हे बांगलादेशी अनधिकृतपणे भारताची सीमा ओलांडून पश्चिम बंगालमार्गने भारतात आले आहेत. त्यांच्याकडून आणखी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी ची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांना आहे.