RCB Victory Parade Update : "किती दरवाजे उघडे होते?" उच्च न्यायालयाचे कर्नाटक सरकारला प्रश्न

RCB Victory Parade Update : "किती दरवाजे उघडे होते?" उच्च न्यायालयाचे कर्नाटक सरकारला प्रश्न

RCB विजय सोहळ्यातील दुर्घटना: उच्च न्यायालयाने मागितला सरकारकडून अहवाल
Published by :
Shamal Sawant
Published on

नुकताच IPL 2025 चा अंतिम सामना पार पडला. यामध्ये RCB संघ विजयी झाला. मात्र चिन्नास्वामी स्टेडियमजवळ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या (RCB)विजयानंतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विजयसोहळ्याला चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आणि कुठेतरी गालबोट लागले. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 33 हून अधिक जण जखमी झाले. स्टेडियमची क्षमता केवळ 35,000 असताना सुमारे 2 ते 3 लाख लोकांनी एकत्र येताच गोंधळ उडाला. गेट क्रमांक 3 जवळ मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

या सगळ्या प्रकारांवर आता उच्च न्यायालययाने कर्नाटक सरकारला प्रश्न विचारले आहेत. उच्च न्यायालयाने विचारले- जेव्हा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला गेला होता, तेव्हा आधीच काय तयारी केली होती? यावर एजी म्हणाले, पहाटे 4 वाजल्यापासून बेंगळुरूच्या कानाकोपऱ्यातून लोक येत होते. पहाटे 3 वाजेपर्यंत चिन्नास्वामी स्टेडियमजवळ गर्दी होती. केवळ राज्यातूनच नाही तर इतर राज्यांमधूनही लोक आले होते. स्टेडियमची सर्व व्यवस्था आरसीबीने केली होती. यानंतर, उच्च न्यायालयाने विचारले, "कार्यक्रमाचे आयोजक कोण आहेत? यावर, एजी म्हणाले, व्यवस्था आरसीबीने केली होती आणि सहकार्य केएससीएने केले होते.

उच्च न्यायालयाने विचारले प्रश्न :

स्टेडियममध्ये किती दरवाजे आहेत? किती उघडे होते?

स्टेडियममध्ये 21 दरवाजे आहेत आणि सर्व उघडे असल्याचे सांगितले जात आहे. स्टेडियमभोवती २ लाख लोक उपस्थित होते. सरकारच्या अपेक्षेपेक्षा जास्त लोक आले होते. बेंगळुरूचे जिल्हा प्रभारी देखील चौकशी करत होते. यावर वकील जीआर मोहन म्हणाले की, फक्त 3 दरवाजे उघडे होते. अ‍ॅडमी म्हणाले की, घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतर संपूर्ण सत्य बाहेर येईल.

उच्च न्यायालयाने सरकारला या घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सुनावणी 10 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या स्नेहमयी कृष्णा यांनी या घटनेबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डीसीएम डीके शिवकुमार आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरुद्ध क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com