'महाराष्ट्राने ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार'; नागपुरात अजितदादांचे बॅनर
थोडक्यात
उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार
नागपूरात ठिकठिकाणी अजितदादांचे बॅनर
'महाराष्ट्राने ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार' अशा आशयाचे बॅनर
नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. नुकतेच विशेष अधिवेशन मुंबईत पार पडले त्यानंतर आता महायुती सरकारचे हे पहिले हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता नागपुरमध्ये अनेक ठिकाणी बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. नागपुरात ठिकठिकाणी अजितदादांचे बॅनर लावण्यात आले आहे. महाराष्ट्राने ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार अजित दादा. अश्या आशयाचे बॅनर नागपुरात लावण्यात आले आहे.
नागपूरच्या देशपांडे सभागृहात हे बॅनर लावण्यात आले असून नागपूरच्या देशपांडे सभागृहात दुपारी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडणार आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.