मोदींचा दहा लाखांचा सूट ओक्के, राहुल गांधींचा टी शर्ट नॉट ओक्के; काँग्रेसची बॅनरबाजी

मोदींचा दहा लाखांचा सूट ओक्के, राहुल गांधींचा टी शर्ट नॉट ओक्के; काँग्रेसची बॅनरबाजी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सध्या मोदी सरकार विरोधात आंदोलन सुरु आहे. देशातील महागाई आणि वाढत्या बेरोजगारीवरून ते सातत्याने केंद्र सरकारला धारेवर धरत असतात. मात्र हे आंदोलन करताना राहुल गांधी यांनी घातलेलं टी-शर्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सध्या मोदी सरकार विरोधात आंदोलन सुरु आहे. देशातील महागाई आणि वाढत्या बेरोजगारीवरून ते सातत्याने केंद्र सरकारला धारेवर धरत असतात. मात्र हे आंदोलन करताना राहुल गांधी यांनी घातलेलं टी-शर्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या टी-शर्टची किंमत तब्बल ४१ हजार २५७ रुपये इतकी आहे. या टी-शर्टवरून भाजपा सध्या राहुल गांधी यांना ट्रोलही करत आहे. “इतकी महाडी टी-शर्ट घालणाऱ्या व्यक्तीला गरीबांचं दु:ख काय कळणार?” असे टोले त्यांना लगावले जात आहेत. या टी-शर्टचा फोटो भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. काँग्रेसने देखिल याला प्रतिउत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदीचा १० लाखांचा सूट आणि १.५ लाखांचा चष्मा यांचं उदाहरण भाजपाला सुनावलं आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून भाजपाविरोधात कल्याणमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मोदींचा दहा लाखांचा सूट चालतो, अनुराग ठाकुर यांच्या मुलाचा बरबरीचा टी शर्ट चालतो, मग राहुल गांधींचा टी शर्ट डोळ्यात का खूपतो? असा सवाल भाजपाला विचारण्यात आला आहे.

यासोबतच या बॅनरवर लिहिले आहे की, वाढती महागाई, बेरोजगारी, वाढणारे पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर, महिलांची असुरक्षिता, शेतकऱ्यांचे प्रश्न, कोलमडलेली अर्थव्यवस्था असे अनेक मोठे प्रश्न देशासमोर सध्या आहेत. असे अनेक प्रश्न असताना जनतेची दिशाभूल करणाऱ्या केंद्र सरकाराचा जाहीर निषेध. असे बॅनरवर लिहिले आहे.

मोदींचा दहा लाखांचा सूट ओक्के, राहुल गांधींचा टी शर्ट नॉट ओक्के; काँग्रेसची बॅनरबाजी
‘वर्षा’वर रात्री उशिरा पार पडली मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची बैठक
Lokshahi
www.lokshahi.com