BCCI & TATA Green Initiative : IPL मॅचमधील प्रत्येक Dot Ball साठी 500 झाडं लावण्याचा महासंकल्प, बीसीसीआयला टाटाची साथ
सध्या सर्वत्र आयपीएलचे वारे वाहत आहेत. आयपीएलचा हंगाम सुरु असताना आता बऱ्याच संघाचे सामने पार पडले आहेत. पण हे सामने पाहत असताना तुमच्या निदर्शनास एक गोष्ट आली आहे का, आता आयपीएल २०२५ च्या सामन्यांदरम्यान प्रत्येक डॉट बॉलसाठी स्कोअर ग्राफिक्सवर हिरव्या झाडांचे सिम्बॉल पाहायला मिळतात. पण या मागचं नेमक कारण काय, जाणून घेतलंय का. खरतंच या मागचे कर्ताधर्ता बीसीसीआय आणि टाटा ट्रस्ट हे आहेत. शिवाय त्याचा थेट संबंध सामाजिक बांधिलकीशीदेखील आहे.
आयपीएल सामन्यांदरम्यान प्रत्येक डॉट बॉलसाठी स्कोअर ग्राफिक्सवर हिरव्या झाडांचे चिन्ह लावले जात आहेत. हिरव्या झाडांचे चिन्ह हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या हरित उपक्रमाचा एक भाग आहे. यासाठी बीसीसीआयने टाटा समूहासोबत भागीदारी केली असून इंडियन प्रीमियर लीगमध्ये टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक डॉट बॉलसाठी ५०० झाडे लावण्याचे आश्वासन दिले आहे. हा उपक्रम २०२३ पासून अमलात आणला असून गेल्या ३ हंगामात बोर्डाने हा उपक्रम राबवला आहे. २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील क्वॉलिफायर १ मध्ये ८४ डॉट बॉल पडले होते. त्यामुळे नियमानुसार ४२ हजार रोपे लावण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सामन्यानंतर ट्वीटव्दारे दिली.
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये बीसीसीआयने त्यांच्या ग्रीन इनिशिएटिव्ह अंतर्गत ४ लाख झाडं बंगळुरूमध्ये नव्याने स्थापन झालेल्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे लावण्यात माहितील दिली होती.