Beed Dhananjay Deshmukh: धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

Beed Dhananjay Deshmukh: धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

बीडच्या मस्साजोग गावात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
Published by :
Prachi Nate
Published on

बीडच्या मस्साजोग गावात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आज आंदोलन करणार आहेत. दरम्यान धनंजय देशमुख हे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्यात होते मात्र त्याठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता, त्यामुळे आता धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहेत. 302 चा गुन्हा दाखल करुन संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला दोषी ठरवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जाणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मसाजोग गावातील मोबाईल टॉवर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काल रात्री उशिरा सीआयडी पथकाने धनंजय देशमुख यांची भेट घेतली. मात्र धनंजय देशमुख आंदोलनावर ठाम आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com