...तोपर्यंत सण साजरा करणार नाही, मस्साजोगच्या ग्रामस्थांनी घेतली शपथ
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 10 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटणेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. काही दिवसांपूर्वी संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे आणि त्यांचा अमानुषपणे छळ करतानाचे अनेक फोटोदेखील व्हायरल झाले होते. त्यामुळे जनतेच्या मनात संतापाची लाट उसळली होती. मस्साजोग येथील ग्रामस्थांनी यावेळी होळी साजरी केली नाही.
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात 9 ते 10 आरोपीना अटक करण्यात आले आहे. सर्व आरोपीवर मोक्कादेखील लावण्यात आलं आहे. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीदेखील मागणी केली गेली. त्याप्रमाणे त्यांचा राजीनामादेखील घेतला गेला. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला सुरु आहे. यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान आता मस्साजोग येथील ग्रामस्थांनी होळी आणि धूळवड साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जोपर्यंत आरोपीना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत कोणताच सण साजरा करणार नसल्याची शपथ ग्रामस्थांनी घेतली आहे.
अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर संतोष देशमुख यांच्या हत्येचे 8 व्हिडीओ आणि 15 फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या फोटोत ही हत्या किची निर्घृण आणि क्रुरतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.